विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृतीसाठी रॅली, चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विभागाने घेतला पुढाकार, राष्ट्रीय उपक्रमाला सहकार्य केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2024

विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृतीसाठी रॅली, चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विभागाने घेतला पुढाकार, राष्ट्रीय उपक्रमाला सहकार्य केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सव



 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस यांच्या आदेशाने चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी आज चंदगड तालुक्यात सर्वत्र गावागावात  प्रभात फेरी काढून ग्रामस्थांच्यामध्ये 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात आली .काल वडिलांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तर आज चंदगड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी  सुभाष बिरांजे यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला याबाबत सूचना देऊन राष्ट्रीय उपक्रमासाठी व विद्यार्थ्यांना आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत आव्हान केले होते. त्या अनुषंगाने आज सर्वत्र प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

        सध्या लोकांच्यात मतदानाबाबत उदासीनता जाणवत असल्याने मतदानाच्या वेळी मतदानाची टक्केवारी कमी होते. शिवाय आपल्या देशाच्या लोकशाहीत मतदानाचे हक्क बजावण्याचे कर्तव्य बजावण्यासाठी मतदाराला त्याच्या मतदानाची जाणीव करून देण्यासाठी या प्रभात फेरीतून मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून आजच्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षकाने या राष्ट्रीय उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभाग करून घेऊ राष्ट्रीय कामात विद्यार्थ्यांचा हातभार लावून त्यांच्यात आनंद उत्सव निर्माण केला.

No comments:

Post a Comment