जांबरे मराठी शाळेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सन्मान सोहळा, ढोलताशांच्या गजरातील मिरवणुकीने गुरुजन भारावले - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2024

जांबरे मराठी शाळेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सन्मान सोहळा, ढोलताशांच्या गजरातील मिरवणुकीने गुरुजन भारावले





चंदगड : सी. एल. वृतसेवा

      मस्तक सुपीक होण्यासाठी पुस्तकाची गरज असते आणि मंदिराहूनही पवित्र जागा ही शाळा असते. त्यामुळेच त्याचे महत्त्व ओळखून जांबरे ग्रामस्थांनी मराठी शाळेला ६५वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ठेवलेल्या गुरुजनांचा सन्मान सोहळा हा राज्यात ऐतिहासिक आहे. हा सन्मान पुढील काळातही सर्वांच्या स्मरणात राहील, असे प्रतिपादन माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी केले. जांबरे (ता. चंदगड) येथे मंगळवारी मराठी शाळेत आयोजित गुरूजनांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विष्णू गावडे होते.

      सुरुवातीलाच ढोल ताशांच्या गजरात सर्व गुरूजनांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे सर्व गुरूजन भारावून गेले. त्यानंतर मधुकर कुलकर्णी, पांडुरंग पाटील, महादेव चाळक, संभाजी खिलारे, अल्ताफ जकाते, गणपती सुतार, के. एस. पाटील, सदाशिव पाटील, दत्तू आवडण, श्रींगारे, अनिल होंडे, कृष्णा पाटील, केंद्रप्रमुख जगताप, बाळू प्रधान, कुंभार, गोरुले व कदम मॅडम, काशीनाथ कोळी, सट्टूप्पा फडके, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, मानपत्र व गांडूळ खत देऊन सत्कार करण्यात आला.

       यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रामकृष्ण गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष दिपाली गावडे व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लक्ष्मण गावडे, भागोजी गावडे यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक दिपक गोरे यांनी सूत्रसंचालन केले. 

No comments:

Post a Comment