तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे एस. के. पाटील व डॉ. सौ. लता एस. पाटील यांच्या घरी उभारलेली पुस्तकांची गुढी |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
आज गुढी पाडण्याचा महत्वाचा सण . या दिवसी सर्वत्र गुढी उभारून नवीन वर्षाची सुरवात केली जाते. पण तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील एस. के. पाटील यांच्या दारी चक्क सात फुटांच्या पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृतीला प्रेरणा दिली .
येथील एस. के. पाटील यांच्या घरी गेल्या अनेक वर्षापासून पुस्तकांची गुढी उभी केली जाते. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शैक्षणिक, कथा, कादंबऱ्या, काव्य, अध्यात्म, स्पर्धा परिक्षा, अभंग आदि ५०० हून अधिक पुस्तके आहेत. या पुस्तकांची गुढी उभारण्यात आली आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने युवक पुस्तकां पासून दूर जात आहेत. पुस्तके वाचल्याने ज्ञान वाढते. वाचन केले तरच आपण वाचणार आहोत. त्यामुळे आपण पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांनाही ती वाचायला सांगायला हवीत. यासाठीच आम्ही पुस्तकांची गुढी उभारली असून या पुस्तकांचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सौ. लता संजय पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment