स्वामीकार रणजीत देसाई यांच्या जयंतीनिमित्त भायखळा- मुंबई येथे २८ रोजी 'सबूद' महानाट्याचा प्रयोग - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2024

स्वामीकार रणजीत देसाई यांच्या जयंतीनिमित्त भायखळा- मुंबई येथे २८ रोजी 'सबूद' महानाट्याचा प्रयोग


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       महान साहित्यिक स्वामीकार पद्मश्री स्व रणजीत देसाई यांच्या जयंतीनिमित्त दि २८ एप्रिल २०२४ रोजी 'सबूद' या महानाट्याचा प्रयोग अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा- मुंबई येथे संपन्न होणार आहे. स्वामीकार रणजित देसाई यांच्या गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित ह्या दोन अंकी नाटकाची निर्मिती चंदगड तालुक्यातील मुंबईस्थित रहिवाशी असलेल्या हौशी नाट्यप्रेमी कलाकारांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' मंडळाने केली आहे. जबरदस्त व धारदार संवाद, हृदयस्पर्शी संघर्षमय कथानक आणि त्यातील पात्रे आपल्या दर्जेदार अभिनयाने रंगभूमीवर जिवंत करणारे चंदगड तालुक्यातील दमदार कलाकार यामुळे या महानाट्याचा लौकिक नाट्य क्षेत्रात अल्पावधीतच सर्वदूर पसरला आहे. 

       या नाट्यप्रयोगासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यसंस्कार मंडळाच्या वतीने दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment