राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत, शेजारी वैद्याकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, प्रा. संजय मंडलिक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक निश्चित विजयी होणार आहेत. पण हा विजय एक लाख एक मतांनी जितका मोठा असेल तितक्याच कोटींचा निधी चंदगड मतदार संघाला दिला जाईल. याबरोबरच चंदगडला उद्योग धंद्याबरोबरच काजू कलस्टरची उभारणी करण्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
यशवंतनगर (ता. चंदगड) येथे कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात मंत्री सामंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
मंत्री उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले ,महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडूण येणार आहेत. २ वर्षात ३८ हजार उदयोगांच्या माध्यमातून १ लाख युवकाना रोजगार मिळाले आहेत. मंडलिकांना निवडून दिल्यास म्हणाल तेथे MIDC उभारणार आहे. १२०० कोटींचा काजू बोर्ड स्थापन केला असून आगामी काळात काजू उद्योगासाठी भरीव मदत करणार आहे.
वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या ५ वर्षात पीएचडी करता येईल इतक्या महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालती झाल्या असल्या तरी या सरकारने प्रचंड मोठी विकास कामे केली आहेत. आमदार राजेश पाटील तर १६०० कोटींचा टप्पा पार करणार आहेत. देशाला जगात १ नंबर बनवायचे असेल तर मोदिंचे हात बळकट करणे गरजेचे असून यासाठी प्रा. मंडलिकाना निवडूण देण्याचे आवाहन केले. आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रामाणिकपणे प्रा. मंडलिकांच्या पाठीशी उभा रहाणार असल्याचे सांगून चंदगड तालुक्यातून उंचाकी मताधिक्य देऊ असा शब्द दिला. महायुतीचे उमेदवार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास जिल्हा अध्यक्ष राजेखान जमादार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकुमामा गावडे, परशराम पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, अभिजित पाटील, महाबळेश्वर चोगुले, जयप्रकाश मन्नोळी, रघुनाथ पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर, भरमाना गावडे, व्हा. चेअरमन तानाजी गडकरी, अनिल सुरुतकर, दयानंद काणेकर, अशोक देसाई, अशोक पाटील, राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळू चौगुले यांनी केले. आभार अभय देसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment