मणेरी नजिक तिलारी नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना, व्यक्ती चंदगड तालुक्यातील असल्याचा संशय दोडामार्ग पोलिसांना संशय - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2024

मणेरी नजिक तिलारी नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना, व्यक्ती चंदगड तालुक्यातील असल्याचा संशय दोडामार्ग पोलिसांना संशय

 


दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा 

      दोडामार्ग तालुक्यातील मणेरी पुलाजवळ तिलारी नदी पात्रात अंदाजे ४० वर्षांच्या युवकाचा मृतदेह दोडामार्ग पोलिसांना ४ मे २०२४ रोजी आढळला होता. गेले आठ-दहा दिवस या व्यक्तीची ओळख न पटल्यामुळे दोडामार्ग पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. मृत व्यक्ती चंदगड तालुक्यातील किंवा अन्य भागातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

     शवविच्छेदन अहवालात या युवकाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. हा खुनाचा प्रकार असून मृतदेहाची ओळख न पटल्यामुळे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अशी माहिती दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे. मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर 'बालाजी लक्ष्मी ज्योती' तर डाव्या हातावर 'रेणुका' असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाच्या घरातून हरवली असल्यास संबंधितांनी पोलीस ठाणे दोडामार्ग  किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment