तेऊरवाडीच्या सौ. स्नेहा दळवी हिने मिळवली अमेरिकेच्या विद्यापिठाची उच्च पदवी - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2024

तेऊरवाडीच्या सौ. स्नेहा दळवी हिने मिळवली अमेरिकेच्या विद्यापिठाची उच्च पदवी

सौ. स्नेहा रोहित दळवी


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
     तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सौ. स्नेहा रोहित दळवी हिने लोयोला युनिव्हर्सिटी, शिकागो अमेरिका या विद्यापिठातून मास्टर इन ह्यूमन रिसोर्सिस ॲन्ड एम्लायमेंन्ट रिलेशन या विषयातील उच्च पदवी संपादन केली.
  सौ. स्नेहा स्वतः बी. ई. झाली असून तीचे पती रोहित सुद्धा बीई (आय टी) आहेत. तेऊरवाडी सारख्या कोरडवाहू गावातील अनेकजन जर्मनी, आर्यलंड, इंग्लड, अमेरिका, दुबई आदि देशामध्ये शिक्षण तसेच नोकरी करत आहेत. आज तेऊरवाडीतील निवृत्त पोलिस अधिकारी रमेश दळवी यांच्या सुनेने अमेरिकेतील नामांकीत विद्यापिठातून उच्च पदवी संपादन केल्याने सौ. स्नेहा हिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment