हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात..! कालकुंद्री येथे भव्य शोभा यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2024

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात..! कालकुंद्री येथे भव्य शोभा यात्रा

कालकुंद्री येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पालखी मिरवणूकीत सहभागी झालेले ग्रामस्थ

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  कालकुंद्री (ता. चंदगड) येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराज यांची १४ मे ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देव गल्ली युवा मंच यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. उमाजी नाईक लेझीम पथकाच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणूक व शोभायात्रेत सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, विलास शेठजी, विठ्ठल पाटील आदी  सर्व सदस्य, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष पुंडलिक जोशी, पोलीस पाटील संगीता कोळी, सुखदेव भातकांडे, भरमू पाटील, पद्माकर पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन विठ्ठल पाटील यांनी केले. विनायक मुर्डेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. रवी पाटील यांनी आभार मानले.

"शिवपुत्र संभाजी यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांची मातृछत्र हरपले. तथापि आजी जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या देखरेखी खाली ते युद्धकला, राज्यकारभार, रणांगणातील डावपेच अशा विविध गुणांमध्ये पारंगत झाले. संस्कृत पंडित असलेल्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधील बुद्धभूषण हा महान ग्रंथ लिहून आपल्या अगाध बुद्धिमत्तेची जाणीव जगाला करून दिली होती. देश व विदेशातील एकूण १७ पेक्षा अधिक भाषा त्यांना अवगत होत्या. ते धुरंदर राजकारणी व शूर योद्धा होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सन १६८१ ते १६८९ अशी नऊ वर्षे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने अशा महान योद्ध्याच्या स्मृतिना मनःपूर्वक अभिवादन...!"

No comments:

Post a Comment