होसूर येथे ग्रामदैवत श्री सत्यनारायण मंदिर वास्तुशांती व कळसारोहन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2024

होसूर येथे ग्रामदैवत श्री सत्यनारायण मंदिर वास्तुशांती व कळसारोहन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न


कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
      होसूर (ता. चंदगड) येथील नवीन बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री सत्यनारायण  मंदिराचा  वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा दि २९/०४/२०२४ ते १/५/२०२४ चार दिवस धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. गावाबाहेर निसर्ग  सानिध्यात बसलेले हे मंदिर गावकऱ्यांच्या व भक्तगणाच्या सहकार्यातून बांधण्यात आले. 
  डॉ. विश्वनाथ मारुती पाटील यांच्या अधिपत्याखाली एस. एल. पाटील व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित वेदशास्त्र संपन्न राजेश कुलकर्णी व सहकारी यांच्या मंत्रघोषात हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याची मूर्ती भेट रविवार दिनांक २७ रोजी करण्यात आली त्यानंतर २८ तारखेला देव देवतांना आवाहन  पार पडले. सोमवार दि. २९ रोजी मूर्ती व कळस मिरवणूक विना पूजन हा सोहळा सर्व गावकऱ्यांच्या समवेत मोठा आनंदात साजरा करण्यात आला. मंगळवार ३० रोजी गणेश पूजन मंडप पूजन, गोमाता पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन नंदिषात प्रसाद अग्निस्थापना अशा सर्व पूजा, बुधवार दि. १ रोजी उर्वरित यज्ञ, कळशा रोहन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, बलिदान, पूर्णाहुती, गंगापूजन, मुर्त्याभिषेक महाआरती पालखी पूजन व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. 
      सलग चार दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या रात्री झालेल्या दीपोत्सवासह सर्वच कार्यक्रमात होसूर पंचक्रोशी व कर्यात भागातील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment