कोल्हापूर जिल्हा कोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली देव रवळनाथ पब्लिक ट्रस्टचे कामकाज सुरू असते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील सुभाष काणेकर यांची निवड करण्यात आली.
त्यांनी जनसामान्य लोकांसाठी केलेले आरोग्य विषयक कार्य व कोरोना सारख्या महामारीमध्ये धाडसाने त्यांनी केलेले कार्य. या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. श्री संस्थान शांता आश्रम चारिटे हळदीपूर मठ होन्नावर कर्नाटक येथे ट्रेझरर व ऑल इंडिया अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
शिवाजीराव पाटील निवडी बद्दल सुनील काणेकर यांचा सत्कार करताना |
तसेच चंदगड मधील ज्येष्ठ नागरिक दिलीपभाई शेलार, आशिष दाणी, बाबुराव उर्फ विवेक बल्लाळ यांनीही त्यांच्या पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
No comments:
Post a Comment