कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील दोन बंद घरांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्याने १२ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक २९ मे २०२४ रोजी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय कोवाड व तेऊरवाडी येथेही चोरट्याने बंद घराची कुलपे तोडून डल्ला मारला आहे. या घटनांची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कागणी येथील लक्ष्मण सट्टूप्पा हे पत्नीसह सकाळी नऊ पूर्वी घराला कुलूप लावून शेतात गेले होते. या काळात अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील ६ लाख २५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. त्यांची मुलगी मनीषा रामलिंग पाटील हिने ठेवलेल्या दागिन्यांचाही समावेश आहे. कागणी येथीलच जोतिबा भरमू बाचुळकर यांच्याही घराचे कुलूप तोडून रोख रुपये ६० हजार व दागिने असे एकूण ५ लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment