गडहिंग्लज येथील रुग्णाला मुख्यमंत्री निधीतून १ लाखाची मदत, अनिरुद्ध रेडेकर यांचे प्रयत्न यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2024

गडहिंग्लज येथील रुग्णाला मुख्यमंत्री निधीतून १ लाखाची मदत, अनिरुद्ध रेडेकर यांचे प्रयत्न यशस्वीगडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा
     पायावरील शस्त्रक्रियेचा अवाढव्य खर्च करणे केवळ अशक्य असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाकडून १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांचे प्रयत्न कामी आले.


   निलजी (ता. गडहिंग्लज) येथील इराप्पा शंकर गौडाडी यांच्या पायावर गंभीर शस्त्रक्रिया होणार होती. त्याचा आर्थिक खर्च काही लाखांच्या घरात असल्याने रुग्ण गौडाडी व त्यांचे कुटुंबीय हतबल झाले होते. ही घटना निलजी ग्रामपंचायत सदस्य अजय मजगी यांना समजताच त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. यावरून रेडेकर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रूपये १,००,०००/- आर्थिक मदत मिळवून दिली. याकामी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांचे सहकार्य लाभले. मदत पत्र प्रदान प्रसंगी रेडेकर, मगजी यांच्या सह निलजी ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य बाळगोंडा पाटील, जयप्रकाश मजगी, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब हुली (टायगर), संतोष कोळी, बाहुबली अम्माणावर, भारतेश अम्माणावर, शिवराज वाळकी, हेब्बाळचे उपसरपंच  सुरज गवळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment