पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या प्राथमिक शिक्षकांचा ३१ रोजी गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2024

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या प्राथमिक शिक्षकांचा ३१ रोजी गौरवकालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना शाखा चंदगड व प्राथ. शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात चंदगड तालुक्यातील वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सपत्नीक सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
   संघटनेचे तालुकाध्यक्ष शि ल होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विरंगुळा केंद्र मजरे कार्वे, ता. चंदगड येथे शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी दुपारी ठीक १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हभप. हिंदुराव भोईटे (सेवानिवृत्त शिक्षक कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

    अमृत महोत्सवी सत्कारमूर्तींमध्ये संभाजी यल्लाप्पा अनगडकर (बेळगाव), जयवंत भाऊ पाटील (हेरे), दत्तात्रय गुंडू कदम (करेकुंडी), मुकुंद गुंड तावडे (सदावरवाडी), शिवाजी रामा रेडेकर (कुदनूर), शिवाजी चाळू नार्वेकर (दड्डी), भागाणा बाळू नागरदळे (कुदनूर), बाबू जोती गावडे (खामदळे), वामन सट्टू भोसले (महिपाळगड), दत्तात्रय यल्लाप्पा कांबळे (मौजे कार्वे), मारुती कल्लाप्पा भोगण (कोवाड), पांडुरंग गुंडू पाटील (बागिलगे), लक्ष्मण सत्तुराम नाईक (कोवाड), विनायक कृष्णाजी कोरडे (बेळगुंदी) या गुरुजींचा समावेश आहे. यावेळी शामराव सिद्धाप्पा पाटील (कालकुंद्री) व सौ सरिता बाळाराम नाईक (मौजे कारवे) या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. 
   यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, सहाय्यक लेखाधिकारी अमर गारवे पंचायत समिती चंदगड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन विरंगुळा केंद्र अध्यक्ष वसंत जोशीलकर व कार्यकारी मंडळ तसेच सल्लागार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment