समीक्षा मुंगुरकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी कु समीक्षा विठोबा मंगूरकर (कालकुंद्री) हिने नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या १० वी परीक्षेत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. तिने या परीक्षेत ९७.२०% (५०० पैकी ४८६ गुण) टक्केवारी घेत हे यश संपादन केले. ती कालकुंद्री केंद्रात प्रथम आली असून आयुषा महेशकुमार पाटील हिने ९४.६०% गुणांसह केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला.
याशिवाय कालकुंद्री येथील अथर्व प्रताप पाटील ९०.६०%, ऋतुजा राजेंद्र पाटील ८८.८०%, संजीवनी कल्लाप्पा बागिलेकर ८८.२०% यांनी अनुक्रमे यश पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, शिक्षक इ एल पाटील, एन जे बाचुळकर, निता कुंभार, भरमाजी तुपारे, प्रशांत कोकितकर, अभिजीत कुंभार, अमोल तळवार, गजानन तळवार, हिशेबकर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. समीक्षा मुंगुरकर हिला प्राथमिक शिक्षक असलेले वडील विठोबा राणबा मुंगुरकर, आई सुनंदा व कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment