चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ५८ लाख १४ हजार ३९३ रुपये इतका गैरव्यवहार झाल्याने. चंदगड पोलीस ठाण्यात काल दि. २७/०५/२०२४ रोजी २१ संचालक व मॅनेजरसह २२ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी यातील ५ आरोपींना आज दि. २८ अटक करून न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
२२ पैकी ५ आरोपी मयत झाले असून उर्वरित आरोपींच्या पोलीस शोध घेत आहे. आज पोलीस कोठडीत रवानगी झालेल्यांमध्ये तत्कालीन व्हाईस चेअरमन शिवाजी आप्पया माने (रा. राजगोळी खुर्द), तत्कालीन संचालक अशोक महादेव पाटील (किटवाड), यशवंत रामा वडर (दुंडगे), दादोबा कृष्णा सुतार (हुंदळेवाडी) व मॅनेजर तानाजी भरमाण्णा पाटील (मांडेदुर्ग) यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून याबाबतचा अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला व सहकारी करत आहेत.
No comments:
Post a Comment