चंदगड शहरामध्ये पावसाच्या सरी पडताना.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरांमध्ये विजेच्या कटकडाटासह आज सायंकाळी साडेपाच वाजता सुमारे अर्धा तास मोठ्या थेंबाचा मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर काही काळ थांबून रात्री साडेसात वाजताही पाऊस झाला. त्यामुळे या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने दुचाकी चाकांची भलतीच गैरसोय झाली. अनेक जण याच पावसातून भिजत दुचाकीवरून घरी जात होते.
सायंकाळी अचानक पाऊस सुरु झाल्याने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकजण भिजतच पावसातून मार्गक्रमण करत होते. चंदगड तालुक्यात आतापर्यंतचे सर्वांधिक तापमान या वर्षी २०२४ च्या उन्हाळ्यामध्ये जाणवत आहे. त्यामुळे अनेक लोक दुपारी बाहेर जाणे टाळतात. गेले १५ दिवस तालुक्याच्या अनेक भागात ढग दाटून येऊन पाऊस पडत होता. मात्र चार ते पाच वेळा चंदगड शहरात केवळ पावसाचे शिंतोडे पडले होते. शहरवासीयांना उष्म्यापासून काहीसा दिलासा मिळविण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा होता. आज झालेल्या पावसामुळे हि अपेक्षा पुर्ण झाली आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती देणारा ठरला आहे.
No comments:
Post a Comment