चंदगड तालुक्याला वळीव पावसाने दुसर्‍या दिवसीही झोडपले - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2024

चंदगड तालुक्याला वळीव पावसाने दुसर्‍या दिवसीही झोडपले

 


चंदगड / प्रतिनिधी :-- 
 चंदगड शहरासह आणि परिसराला रविवारी सायंकळी सात वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले.दरम्यान काल शनिवार दि.११ रोजी सायंकळी सहा वाजता  ढगांच्या गडगडाटात जवळपास दोन तास पाऊस पडत होता . यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले , तर लग्न सराई असल्याने  बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली . पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला होता . दरम्यान , या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे . दुपारी चारच्या सुमारास चंदगड शहर आणि परिसरात आभाळ भरून आले . त्याचबरोबर ढगांचा गडगडाट सुरू झाला . पावसाला सुरुवात झाली . प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले . त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. गेल्या दोन महिन्यांपासून चंदगड शहराला हुलकावणी दिलेल्या वळीवाने वातावरणात गारवा निर्माण झाला.त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.हा पाऊस ऊस व काजू पिकांना लाभदायक ठरला आहे.वळीव पावसाने तालुक्यात सूरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला असून पावसामुळे डांबरी रस्त्यांची कामे दर्जेदार होणार नाहीत त्यामुळे डांबरीकरणाची कामे थाबवावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment