तेऊरवाडीत वादळी वाऱ्यासह वळीव कोसळला, ग्रामपंचायतीचे छत घरावर कोसळल्याने लाखोचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2024

तेऊरवाडीत वादळी वाऱ्यासह वळीव कोसळला, ग्रामपंचायतीचे छत घरावर कोसळल्याने लाखोचे नुकसान

 

तेऊरवाडी येथे वादळी वाऱ्याने ग्रामपंचायतीचे उडालेले छत.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         आज दुपारी जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने किणी कर्यात भागाला झोडपून काढले. तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीचे छत वादळाने उचलून रस्त्या पलिकडे असणाऱ्या मारूती शिवाना पाटील यांच्या घरावर पडल्याने अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

        दुपारी 3 वाजता कोवाड परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार वळीव पावसाने झोडपून काढले. यामध्ये ठिकठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडल्याने विज पुरवठा खंडीत पडला. अनेक ठिकाणी घरांची कौले व पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. 

     तेऊरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्यावरील संपूर्ण छत आकाशात उडाले. हे छत थेट रस्त्या पलिकडील मारुती पाटील यांच्या घरावर आदळून तेथून बस स्टॉपवर येऊन पडले. सुदैवाने यावेळी या ठिकाणी कोणीही नसाल्याने जिवित हानी टळवी. यामध्ये मारूती पाटील यांच्या छप्पराचे प्रचंड नुकसान झाले. पावसाचे पाणी घरात आल्याने प्रापंचिक साहित्य भिजून अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर ग्राम पंचायतीचे २ लाखांचे नुकसान झाले. छत  रस्त्यावर पडल्याने नेसरी कोवाड वाहतूक १ तास ठप्प झाली. शेती साठी पाऊस उपयुक्त असला तरी वादळी वाऱ्यांने प्रचंड नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment