चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील खेडुत शिक्षक मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे महात्मा फुले विद्यालय, कार्वे (ता. चंदगड) येथे दहावी च्या सन २००३-०४ च्या विद्यार्थ्यांनी तब्बल २० वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. एम. गावडे, श्री. कागणकर, एस. बी. पाटील, श्री. वर्पे, श्री. सोमनाचे, श्री. मोहनगेकर, श्री. बालेशगोल, आर. पी. पाटील, वसंत कांबळे, श्री. सुरुतकर, श्री. जाधव, श्री. हारकारे, के. डी. पाटील आदी शिक्षक आणि रामा तरवाळ आणि शांताराम गावडे शिपाई उपस्थित होते. यांचा गौरव करून एक कृतज्ञता व्यक्त केली.
दहावी च्या 'अ' आणि 'ब' अशा दोन्ही वर्गातील १०० मुलां /मुली नी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम चं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभरापासून असलेली पूर्वतयारी, शिस्तबद्ध नियोजन, अगदी दूरवरून फक्त सोहळ्यासाठी उपस्थित असलेली मित्रमंडळीमुळे कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.
यावेळी शिक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांविषयी स्तुतीसूमने, विद्यार्थी मित्रांनी आपल्या मनोगतात शाळेच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी वर्गातील मुला / मुलींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment