कालकुंद्री येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. छाया राजाराम जोशी होत्या. वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले.
यावेळी एमडी पदवी प्राप्त रामराव अशोक पाटील, बी. ए. एम. एस. पदवी प्राप्त श्रेया नारायण जोशी, भौतिक शास्त्रातील पी. एच. डी. पदवी प्राप्त विठोबा लक्ष्मण पाटील तर पांडुरंग राजाराम पाटील यांची अन्वेषकपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. वर्षातील उत्कृष्ट वाचक सन्मान सौ. शिला गुंडू पाटील, सौ. शेवंता बाबू पाटील, गुंडू राजेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील यांनी आईंच्या स्मरणार्थ २१ पुस्तके, कालकुंद्रीचे सुपुत्र व अमेरिकेतील इंजिनियर विजय गुंडू पाटील यांनी २० हजार रुपयांची पुस्तके दिल्या बद्दल त्यांच्या कुटुंबियांचा, वर्षभर प्रत्येकी एक वर्तमानपत्र देणारे देणगीदार अशोक यशवंत वर्पे, निशांत नरसू पाटील, छाया राजाराम जोशी, अर्जून पांडुरंग पाटील यांचा तसेच वर्षभर अर्थिक, वस्तू, पुस्तके व अन्य स्वरूपात मदत करणाऱ्या ग्रामस्थांचा स्मृतिचिन्ह, आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक रामू पाटील यांनी वाचनालयासाठी ५ हजार तर सचिव श्रीकांत कदम यांनी ११११ रुपये देणगी दिली.
यावेळी निवृत्त प्राचार्य जी. एस. पाटील, अरविंद कोकीतकर, झेवियर क्रुझ, सुनंदा पाटील, भरमू पाटील, किशोर कांबळे, विनायक पाटील, नारायण पाटील, बाबू पाटील, राजाराम पाटील, यशवंत पाटील आदींसह वाचनालयाचे पदाधिकारी विलास शेटजी, पी. एस. कडोलकर, शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील, वंदना पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज क. पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment