सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास सेवानिवृत्तीनंतर चे जीवन सुखकर होईल....! -हिंदुराव भोईटे, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या प्राथ. शिक्षकांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2024

सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास सेवानिवृत्तीनंतर चे जीवन सुखकर होईल....! -हिंदुराव भोईटे, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या प्राथ. शिक्षकांचा गौरव


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
    सेवानिवृत्तीनंतर चे जीवन सुखकर होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवा, चांगले छंद जोपासा, वर्षातून किमान दोन वेळा मित्रांसोबत पर्यटन करा, आपले विचार दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नका, व्याजावर जगण्यापेक्षा मुद्दलावर जगण्याचा प्रयत्न करा असे विचार हिंदुराव भोईटे (कोल्हापूर) यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना शाखा चंदगड व प्राथ. शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात चंदगड तालुक्यातील वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सपत्नीक सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष शि ल होनगेकर होते.
    सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या कार्वे, ता. चंदगड येथे उभारलेल्या स्वमालकीच्या विरंगुळा केंद्रात शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत वसंत चांदीलकर, शंकर शिंदे, य सि पाटील, जी व्ही दैठणकर, सु ल गुंडप यांनी केले. विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंत जोशीलकर यांनी संघटनेचा व विरंगुळा केंद्राचा आर्थिक अहवाल वाचून दाखवला. प्रास्ताविक सल्लागार कमिटी सदस्य एम टी कांबळे यांनी केले. यावेळी अमृत महोत्सवी सत्कारमूर्ती संभाजी यल्लाप्पा अनगडकर (बेळगाव), जयवंत भाऊ पाटील (हेरे), दत्तात्रय गुंडू कदम (करेकुंडी), मुकुंद गुंड तावडे (सदावरवाडी), शिवाजी रामा रेडेकर (कुदनूर), शिवाजी चाळू नार्वेकर (दड्डी), भागाणा बाळू नागरदळे (कुदनूर), बा. जो. गावडे (खामदळे), वामन सट्टू भोसले (महिपाळगड), द. य. कांबळे (मौजे कार्वे), मा. क. भोगण (कोवाड), पांडुरंग गुंडू पाटील (बागिलगे), ल. स. नाईक (कोवाड), विनायक कृष्णाजी कोरडे (बेळगुंदी) यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक शामराव सिद्धाप्पा पाटील (कालकुंद्री) यांनी विविध सेवाभावी संस्थांना ५  लाख रुपये देणगी दिल्याबद्दल तर सौ सरिता बाळाराम नाईक (मौजे कारवे) यांना जिप. चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर कालकुंद्री येथील हुसेन शमशोद्दीन मोमीन यांनी वयाची ९४ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

   यावेळी उपस्थित चंदगड तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी सन १९९५ ते २००० मधील चंदगड तालुक्यातील शैक्षणिक घडामोडींना, आठवणींना उजाळा देताना आपल्या आयुष्यातील तो सुवर्णकाळ होता असे गौरवोद्गार काढले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव हवालदार (भुदरगड), द. गुं. कदम, शामराव पाटील, सरिता नाईक आदींनी मनोगते व्यक्त केली.
   यावेळी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी शामराव काशीद, बळीराम रेपे, वि द बर्गे (राधानगरी), अरूण पाटील (गारगोटी), शिवाजी बिरजे (आजरा), शिवाजी निर्मळकर (गडहिंग्लज) आदी मान्यवरांसह चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांसह गडहिंग्लज, आजरा, राधानगरी आधी तालुक्यातील शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment