चंदगड : सी एल वृत्तसेवा
शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी संचलित मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. त्यामुळे शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षेला एकूण २९ विद्यार्थी बसले होते ते सर्व पास झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांत अनुक्रमे
पियुष सूर्यकांत पाटील 90.80% (प्रथम), कु. पल्लवी परशराम पाटील. 88.60% (द्वितीय), कु. पूजा पांडुरंग सुतार 88.40% (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन मनोहर चौगुले, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक एन. जी. यळळूरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment