चंदगड येथे कार-दुचाकी अपघातात महावितरणचे अभियंता विशाल लोधी गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2024

चंदगड येथे कार-दुचाकी अपघातात महावितरणचे अभियंता विशाल लोधी गंभीर जखमी


चंदगड : सी एल वृत्तसेवा
   काल दिनांक 31 रोजी दुपारी चंदगड ते चंदगड फाटा दरम्यान झालेल्या मोटरसायकल- कार अपघातात महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विशाल गुरुप्रसाद लोधी वय 46 हे गंभीर जखमी झाले. घटनेची फिर्याद गुरुप्रसाद अनंत मोरे (सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी चंदगड) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. 

      याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, चंदगड येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विशाल गुरुप्रसाद लोधी हे आपल्या मोटरसायकलवरून काल दि. 31/05/2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदगड फाट्यावरून चंदगडकडे जात असताना चंदगड बाजू कडून चंदगड फाटा (बेळगाव वेंगुर्ला हायवे) कडे येणारी लाल रंगाची नॅनो कार नंबर MH 09, BX 8310 च्या चालकाने सदरची कार भरधाव वेगात रॉंग साईडने चालवून पोलीस कॉर्टर्स नजीक लोधी यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात  धडक दिली. या अपघातात लोधी यांच्या उजवा पाय, उजवा हात, कपाळ व नाकावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेतील अज्ञात कार चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 279, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देसाई अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment