तडशीनहाळ : त्या तरुणांच्या कुटुंबीयांकडे ठेव पावती प्रदान करताना सतीश हलकर्णीकर, रविंद्र कोनेवाडकर, दौलत पाटील, पुंडलिक मसुरकर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयचे 2003 चे माजी विद्यार्थी मस्ती की पाठशाळा ग्रुप मार्फत सरसावले आणि तडशीनहाळ येथील अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरूणांच्या कुटुंबीयांना 35 हजार ची मदत केली.
गेल्या महिन्यात रमेश कडोलकर हा 33 वर्षांचा तरूण शिनोळी येथुन कामावरून घरी येताना रस्ते अपघातात मृत्युमुखी झाला. मनमिळावू, विश्वासु, गरीबीची जाण असणारा, होतकरू तरूण गेल्याने सारी पंचक्रोशी हळहळली. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन मुली असा त्याचा परीवार. हिमालयासारख्या बापाला जेव्हा काळ हिरावुन घेतो तेव्हा त्या कोवळ्या जीवांची अवस्था शब्दात वर्णन न करणारी असते. त्यांच्या कुटुंबीयांचे अपरिमित नुकसान झाले. त्यांना गरज आहे. ती भक्कम आधाराची, हीच बाब ओळखुन दरसाल दरवर्षीप्रमाणे सामाजिक योगदानात मोलाचं कार्य करणाऱ्या या जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक हाक मदतीची....या आशयाखाली मदतीचे आवाहन केले. तात्काळ वरील विषय साऱ्या मित्रांना समजला आणि पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव, सैनिक मित्र, स्थानीक व्यावसायिक मित्र,शेतकरी मित्र, परदेशस्थित मित्र सारे सरसावले आणी बघता बघता 35,000/-इतकी रक्कम जमा केली. व आज 1 जुन रोजी रोपटे, सहकारी बँक मधील मुलींच्या नावे 30,000/- चे दामदुप्पट ठेव सर्टिफिकेट, व शालेय वर्षासाठी लागणारे सर्व साहित्य भेट देण्यात आले. वरील मदत पाहुन सारे कुटुंबीयांना अश्रु अनावर झाले. आमची ही मदत सर्व वर्गमित्राकडुन रमेश साठी खरी श्रध्दांजली असेल, इतरांनी ही कडोलकर कुटुंबीयांसाठी पाठीशी रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रतिनिधी म्हणुन सतीश हलकर्णीकर, रविंद्र कोनेवाडकर, दौलत पाटील, पुंडलिक मसुरकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment