कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2024

कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांना मातृशोक

श्रीमती शांता राणबा पाटील
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
यादव गल्ली, कालकुंद्री, ता. चंदगड येथील रहिवाशी श्रीमती शांता राणबा पाटील, वय ८६ यांचे रविवार दि. २ जून २०२४ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोवाड येथील प्राध्यापक डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कालकुंद्री येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
  रक्षा विसर्जन उद्या सोमवार ३ जून २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता आहे.

No comments:

Post a Comment