किल्ले पारगड येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार संपन्न, विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2024

किल्ले पारगड येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार संपन्न, विविध कार्यक्रमांचे आयोजन



कार्वे / सी. एल. वृत्तसेवा

      मजरे कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन व पारगड ग्रामस्थांच्या वतीने सालाबादाप्रमाणे ५ जून २०२४ व ६ जून २०२४ रोजी विविध कार्यक्रमानी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले पारगड येथे संपन्न होणार आहे.

     ५ जून २०२४ रोजी दुपारी २ ते ४ या दरम्यान गड स्वच्छता मोहीम, ४ ते ५ या दरम्यान गडाचे पूजन, ५ ते ६.३० या दरम्यान प्रसिद्ध गायक अभिजीत पाटणे यांचा राष्ट्रभक्ती धारा गीते कार्यक्रम, ६.३० ते ८ या दरम्यान हत्ती आणि जंगल यावर आनंद शिंदे यांचे मार्गदर्शन, ८.३० ते ९.३० दरम्यान प्रसिद्ध शाहीर रंगराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा पोवाडा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९.३० नंतर गोंधळ व गड जागरण हलगी सम्राट संजय आवळे व सहकारी कोल्हापूर यांच्या प्रसिद्ध हलगी वादनाने संपन्न होणार आहे. 

      ६ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.३० यादरम्यान मजरे कार्वे येथील सर्व भजनी मंडळांमार्फत काकड आरती, ८.१५ ते ९ या दरम्यान ध्वजारोहण व भंडारा उधळण, ९ ते १० दरम्यान शिवकालीन युद्ध कलांचे प्रात्यक्षिक कोल्हापूर येथील वस्ताद दिगंबर खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यां मार्फत सादरीकरण करण्यात येणार आहे. सकाळी १० ते ११ यादरम्यान शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. त्यानंतर ११ ते १२.३० यादरम्यान जागर शिवशाहीर यांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम होणार असून यानंतर महाप्रसादाने या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सीमा भागातील, गडहिंग्लज, सावंतवाडी, दोडामार्ग, आजारा यासह चंदगड तालुक्यातील विविध गावातून शिवभक्त गडावर येणार आहेत. तरी या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन पारगड ग्रामस्थ व शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन मजरे कार्वे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment