किल्ले पारगड येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेकदिन सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2024

किल्ले पारगड येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेकदिन सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन


कार्वे : सी एल वृत्तसेवा
        मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन व पारगड ग्रामस्थांच्या वतीने सालाबादाप्रमाणे ५ व ६ जून २०२४ रोजी किल्ले पारगड येथे विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा  संपन्न होणार आहे.
     ५ जून २०२४ रोजी दुपारी २ ते ४ वाजता गड स्वच्छता मोहीम, ४ ते ५ गड पूजन, सायंकाळी ५ ते ६.३० प्रसिद्ध गायक अभिजीत पाटणे यांचा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ६.३० ते रात्री ८  हत्ती आणि जंगल यावर आनंद शिंदे यांचे व्याख्यान, रात्री ८.३० ते ९.३०  शाहीर रंगराव पाटील व सहकाऱ्यांचा पोवाडे कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.३० नंतर गोंधळ व गड जागरण हलगी सम्राट संजय आवळे व सहकारी कोल्हापूर यांच्या प्रसिद्ध हलगी वादनाने संपन्न होणार आहे. 
      ६ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.३० वाजता काकड आरती, ८.१५ ते ९ ध्वजारोहण व भंडारा उधळण, ९ ते १०  कोल्हापूर येथील वस्ताद दिगंबर खांडेकर व सहकाऱ्यांची शिवकालीन मर्दानी व युद्धकला प्रात्यक्षिके, १० ते ११ मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. दुपारी ११ ते १२.३० 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' या कार्यक्रमानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्यासाठी बेळगाव सीमाभाग, गडहिंग्लज, सावंतवाडी, दोडामार्ग, आजरा व चंदगड तालुक्यातून शिवभक्त गडावर येणार आहेत. तरी या ऐतिहासिक सोहळ्याचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन पारगड ग्रामस्थ व शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन मजरे कार्वे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment