गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील अडकूर येथे झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर व गटारे बांधण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2024

गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील अडकूर येथे झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर व गटारे बांधण्याची मागणी

  

सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना अडकूर येथील ग्रामस्थ

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्ग रुंदीकरणासह नवीन तयार करण्यात आल्यापासून मार्गावरील वाहतूक वाढण्याबरोबरच वाहने सुसाट धावत आहेत. परिणामी मार्गालगत येणाऱ्या गावांच्या परिसरात अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

       याच मार्गावरील अडकुर हे बाजार पेठेचे गाव असून येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मुख्य रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते अडकुर स्टॅन्ड परिसरात आहेत. तथापि येथे स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्टे अपघात आदी टाळण्यासाठी च्या उपाययोजना कुठेच दिसत नाहीत.  परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे. रोज छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडत असून गंभीर अपघात घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे स्पीड ब्रेकर व झेब्रा क्रॉसिंग अशा उपायोजना कराव्यात. अशा मागणीचे निवेदन नुकतेच संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

        तसेच रस्ता कामाबरोबरच गावानजीकच्या भागातील दोन्ही बाजूची गटारे बांधणे आवश्यक असताना ती बांधलेली नाहीत. त्यामुळे पावसाच्या वेळी गावातून येणारे पाणी थेट मुख्य रस्त्यावर येत असते. हे टाळण्यासाठी दोन्ही बाजूची गटारे बांधून मुख्य डांबरी रस्ता ते गटारी यांच्या दरम्यानच्या भागात पेविंग ब्लॉक बसवण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. 

       या मागण्यांचे निवेदन अडकुर ग्रामपंचायत आणि शिवसह्याद्री ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी सुरेश दळवी, सरपंच सचिन गुरव, ग्रामसेवक घाडगे, ग्रामपं. सदस्य अभिजित देसाई, शिवराज देसाई, सागर इंगवले, माजी उपसरपंच गणेश दळवी, बबन द. देसाई, विलास देसाई, बाळू कलागते, नंदू सावर्डेकर, गोविंद देसाई, सुतार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment