सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2024

सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर विभागाच्या वतीने सह्याद्री प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील किल्ले गंधर्वगडच्या पायथ्याला ऐतिहासिक कोरज गावात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष वाढीसाठी वृक्ष भोवती जाळी लावण्यात आली आहे. दरवर्षी १०० झाडे लावण्याचा सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर विभागाचा संकल्प आहे. 

    सह्याद्री प्रतिष्ठानची सुरवात १६ वर्षापूर्वी संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांनी दुर्गसंवर्धन हे तत्व उराशी बाळगून कामाला सुरवात केली. आज संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य अविरत सुरु आहे. यावेळी संतोष मालुसरे, गोविंद मासरणकर, राज गावडे, गणेश मांगले, गंधर्वगड, कोरज व कुर्तनवाडी गावचे उपसरपंच डॉ. नितीन लाडोबा देवळी यांनी उपस्थित दुर्ग सेवकांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment