सातवणेच्या फणसांची चव खूप न्यारी, पर्यटकांना लागली आहे याची गोडी - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2024

सातवणेच्या फणसांची चव खूप न्यारी, पर्यटकांना लागली आहे याची गोडी

 


तेऊरवाडी / एस के पाटील

     जगातील सर्वात मोठे वृक्षाला लागणारे फळ म्हणजे फणस. या फणसाचे उत्पादन चंदगड तालूक्यात होत असले तरीही सातवणे येथे उत्पादीत असणाऱ्या फणसाला वेगळीच गोडी असल्याने परराज्यातून गोव्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या पर्यटकांना या फणसांची चव खूपच आवडत असल्याने सातवणे (ता. चंदगड) येथील फणस खरेदी करण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

सातवणे (चाळोबा) येथे फणस विक्री करताना भिमा आपटेकर

    मूळचा भारत देशात निर्माण झालेला व उष्ण कटीबंधीय असणारे फणसाचे झाड भारताच्या पश्चिम घाटात आढळते. विशेषतः चंदगड - आजरा तालूक्यात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फणसाच्या तीन जाती आहेत . यामध्ये बरका फणस कि जो अधिक मधूर आणि रसाळ असतो. कापा फणस बरका फणसापेक्षा कमी गोड असतो. अन तिसरा फणस विलायती. याचा वापर केवळ भाजीसाठी करतात. या फणसाला आर्टोकार्पस हेटरो फिलस किंवा जॅकफ्रूट , जॅक 'नांगका' खनोर, मेनी आदि नावानेही ओळखतात. यामध्ये व्हीटॅमिन ए, सी , थायमिन ' रिबोफ्लेविन , कॅल्शीयम , पोटॅशियम , लोह , सोडियम , जस्त यासह अनेक पोषक घटक आहेत . यामध्ये कमी उष्मांक असतो. १०० ग्रॅम गऱ्यामध्ये ९४ कॅलरीज असतात. पोटॅशियम अधिक असत्याने फणस खाल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते असे निरीक्षण अमेरिकन हार्ट असोसिएशन ने सांगीतले आहे. भारत देशाबरोबरच मलेशिया , बॉझिल, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण फ्लोरिडा आदि मोजक्याच देशात फणस उत्पादन घेतले जाते. वर्षाला एका झाडाल १५० ते २०० फणस लागतात. दोन फूट लांबी वाढते तर वजन १० किलो पर्यंत असू शकते.

 चंडगड तालूक्यातील पश्चिम कोकण पट्यात मोठ्या प्रमाणात फणसाठी झाडे आहेत . नेसरी -चंदगड -तिलारी राज्यमार्ग तसेच शिनोळी ते कानूर या रस्त्यांच्या बाजूला ठिकठिकाणी असे फणस विक्रीला ठेवले ले दिसून येतात . नागनवाडी  बस स्टॉप वर तर मोठ्या प्रमाणात फणस आहेत . अडकूर ते सातवणे पर्यंतही असे फणस ठिकठिकाणी दिसून येतात . तेलंगणा राज्यातून गोव्याला पर्यटनासाठी जाणारे पर्यटक सातवणे येथील फणस खरेदी करण्याला पसंती देत आहेत . येथील प्रा नागेश गुरव यांना तेलंगाणातील पर्यटकांनी येथील फणसाच्या गोडी बद्दल खूप संदेश पाठवले आहेत. एकदरीत येथील फणस चविष्ठ असल्याने अगदी ५० रुपया पासून ते 300 रुपयापर्यंत फणस विकला जात आहे.

No comments:

Post a Comment