माणगाव येथील श्री माणकेश्वर बोर्डिंग मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2024

माणगाव येथील श्री माणकेश्वर बोर्डिंग मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशतेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
     नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगांव  संचलित श्री माणकेश्वर बोर्डिंग माणगांव (ता. चंदगड ) या वसतिगृहात अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक मागास या प्रवर्गातील इ.5वी ते इ.12वी च्या विद्यार्थ्यांना सन 2023-24या वर्षाकरिता मोफत प्रवेश देने सुरु आहे. तसेच या वस्तीगृहात विद्यार्थ्याना राहण्याची, जेवणाची, अंथरून -पांघरून इत्यादी सर्व सुविधा मोफत आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यानी आधारकार्ड, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे घेऊन संस्थेचे कार्यवाह  पी. वाय. पाटील  व अधीक्षक  एम. एम. धामणेकर यांचेशी  9420969816 व 9021142368 या फोन नंबरवर त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment