श्रावणी दयानंद पाटील |
तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्रावणी दयानंद पाटील हिने देश पातळीवर घेण्यात आलेल्या निट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले.
श्रावणीने या निट परीक्षेत 720 पैकी 685 गुण प्राप्त करत सर्व विषयात 99 च्या वर पर्सेन्टाईल मिळवून संपूर्ण भारतात 6773 तर खुल्या गटात 3211 रँक मिळवली. या परीक्षेला भारत देशातून 26 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये श्रावणीचे हे यश म्हणजे सुवर्ण क्षणच आहे. यापूर्वी 10 वी बोर्ड परीक्षेत श्रावणीने 98 % व 12 वी मध्ये 90 % गुण मिळवून तेऊरवाडीमध्ये प्रथम येण्याचा सन्मान मिळवला होता.
श्रावणीला वडील डॉ दयानंद रामू पाटील, आई डॉ. सौ. स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उज्वल यशाबद्दल श्रावणीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment