चंदगड : सी एल वृत्तसेवा
अत्यंत अटीतटीने झालेल्या 'लोकसभा निवडणूक २०२४' च्या महा मुकाबल्यात महाराष्ट्र राज्याचा विचार करता काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला धोबीपछाड दिला. महाविकास आघाडीने या निवडणुकी त ४८ पैकी ३० जागा जिंकल्या असून सांगली येथील काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या एका जागेचा विचार करता महाविकास आघाडीची मजल ३१ पर्यंत गेली आहे. निवडणूकीच्या सुरुवातीस भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी यांच्या महायुतीने दिलेल्या ४५ प्लस जागांवरील विजयाचा दावा मतदारांनी फोल ठरवल्याचे दिसून आले आहे. केंद्रात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मची शक्यता वाढली असली तरी इंडिया आघाडीच्याही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान मुंबईत केवळ 'ठाकरे ब्रँड महत्त्वाचा आहे हे मतदारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या निवडणूक निकालाचा लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर निश्चितच प्रभाव पडेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आज सायंकाळी रात्री ९ वाजता निवडणूक आयोग व शासकीय अधिकृत आकडेवारीनुसार निकाल घोषित करण्यात आले आहेत. ते आम्ही खास सी एल न्यूज च्या वाचकांसाठी देत आहोत ते पुढील प्रमाणे.
४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
(टीप : उशिरा आलेल्या निकालामध्ये काहीसा बदल संभवतो)
No comments:
Post a Comment