माडखोलकर कॉलेजच्या प्रा. संजय ना. पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2024

माडखोलकर कॉलेजच्या प्रा. संजय ना. पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

  

प्रा. संजय ना. पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

         माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्रा. डॉ. संजय नारायण पाटील (एस. एन. पाटील) यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव, इंटिग्रेशन सोशल वेल्फेअर सोसायटी,  बेळगाव व हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा  'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. 

        बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात मा केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते  फाउंडेशन चेअरमन डॉ. सीमा इंगोळे, केंद्रीय मंत्री, श्रीमती रत्नमाला सावनुर, खासदार, अमरसिंह पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख, महेश मेघण्णावर, महापौर राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

         कोरोना व महापूराच्या कालावधीतील सामाजिक योगदानावद्दल त्याना  शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने यापूर्वी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी शैक्षणिक पात्रतेत नेहमी उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत. (MA, B Ed, M.Phil, SET, Ph.D) 

       त्यानी संशोधन कार्यात्मक उल्लेखनीय योगदान  दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर 38 प्रबंध सादर करुन विविध जर्नलमध्ये  प्रकाशीत केले आहेत. त्यांना आई-वडिल, कुटुंबीय, गुरूजन व मित्रांचे आशीर्वाद व प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment