चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापुर मान्यताप्राप्त खेडूत शिक्षण मंडळ, संचलित "महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृह चंदगड (ता. चंदगड) "या वसतीगृहामधे सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या गरीब, हुशार, गरजू व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेण्यासाठी आवाहन वसतीगृह अध्यक्ष एल. डी. कांबळे व अधिक्षक आर. जी. साबळे यांनी केले आहे.
आरक्षणाप्रमाणे वसतीगृहामधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चीत करावा.
सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह मुलकी अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो ई. कागदपत्रासह प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित असल्याने त्वरीत श्री. साबळे यांच्याशी 9420969274 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment