चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कुस्ती कला व कुस्ती खेळाचे आश्रयदाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या कुस्ती संकुलाचे उद्घाटन उद्या दि. २६/०६/२०२४ रोजी होत आहे.
क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली वस्ताद व हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंग यांच्या शुभहस्ते या कुस्ती संकुलाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. एस. व्ही. बनसोडे, डॉ. पी. टी. गायकवाड प्रभारी संचालक विद्यार्थी विकास विभाग आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment