कोवाड येथे जुन्या वादातून कोल्ड्रिंक हाऊस चालकास मारहाण, पोलिसांत फिर्याद - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2024

कोवाड येथे जुन्या वादातून कोल्ड्रिंक हाऊस चालकास मारहाण, पोलिसांत फिर्यादचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     कोवाड (ता. चंदगड) येथे मुख्य बाजारपेठेत दसरा चौकातील कोल्ड्रिंक हाऊस चालकास जुन्या वादातून मारहाण झाल्याबद्दल चंदगड पोलिसात फिर्याद नोंद झाली आहे. ही घटना कर्यात भागात चर्चेचा विषय ठरली आहे.
      याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी. कोवाड येथील बाजारपेठेत ओमकार विजय सोनार यांचे आस्वाद कोल्ड्रिंक्स नावाचे दुकान असून ते स्वतः दुकान चालवतात. दि १२/०६/२०२४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुकानासमोर ते आपल्या मित्रासोबत बोलत उभे असता कल्लाप्पा सत्तूराम भोगण (रा. कोवाड) यांनी जुना वाद उकरून काढत ओमकार यांच्यासोबत वाद घालून त्यांना हाताच्या ठशाने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेनंतर ओमकार सोनार (रा. रणजीत नगर कोवाड) यांनी चंदगड पोलिसात तक्रार दिली असून संशयित आरोपी कल्लाप्पा भोगण यांचेवर भारतीय दंड विधान संहिता कलम 323 व 504 अधिनियम 1860 नुसार अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने पोलीस सब इन्स्पेक्टर नाईक अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment