दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे पर्यावरण पुरक स्वागत, पुष्गच्छाला दिला फाटा - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2024

दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे पर्यावरण पुरक स्वागत, पुष्गच्छाला दिला फाटा

 


चंदगडः सी. एल. वृतसेवा

     येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इ पाचवी व आठवी च्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोपे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते.

    शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याना शासनाकडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

   शाळेच्या प्रवेशद्वारामधून नवोदित विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

   शाळेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेच्या पहिल्याच दिवशी रोपे देऊन स्वागत करण्यात आले. रोपे लावून ती जगवण्याची शपत घेण्यात आली.

     कार्यक्रमाला आर. पी. पाटील, टी एस. चांदेकर, एम . व्ही . कानूरकर, व्ही .के. गावडे, टी. टी. बेरडे, व्ही . एम . मोहणगेकर, जे जी .पाटील, डी जी पाटील, व्ही. टी. पाटील, टी एस. खंदाळे, एस जे. शिंदे, पुष्पा सुतार, व्ही . क़े पाटील, व्ही. एम. डोंगरे, ओंकार पाटील, आर . एस . कांबळे ग्रंथपाल शरद हदगल, कुंदन पाटील, हणमंत सुतार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार बी. आर. चिगरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment