शाळांची घंटा आज खणखणली, विविध उपक्रमानी विद्यार्थ्यांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2024

शाळांची घंटा आज खणखणली, विविध उपक्रमानी विद्यार्थ्यांचे स्वागत

 

श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी - बुझवडे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुस्तके वाटण्यात आली.

चंदगड / सी एल वृत्तसेवा

    मे महिन्याच्या  उन्हाळी  दिर्घ सुट्टीनंतर आज शाळांच्या घंटा खणखणल्या. आज पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात आले.

    आज १५ जून रोजी शासन आदेशाप्रमाणे सर्व माध्यमांच्या शाळा आज चालू झाल्या . आज शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुले व पुस्तके देवून स्वागत करण्यात आले. तर काही शाळानी या नवोदित विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. अनेक शाळामध्ये गोड जेवणाचा बेत केला होता. सर्व शाळा सजवलेल्या होत्या. शालेय आवारात  रांगोळीचा सडा टाकण्यात आला होता. एकंदरीत नविन दाखल होणाऱ्या विद्यार्थांना नवीन शाळेची गोडी लागावी भयमुक्त वातावरण रहावे यासाठी सर्वच शाळांनी जय्यत तयारी करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थी ही आनंदाने पहिल्या दिवशी शाळेत रमले.

No comments:

Post a Comment