नेसरी येथे ग्लोबल टीचर डॉ. डिसले गुरुजींचे रविवारी मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2024

नेसरी येथे ग्लोबल टीचर डॉ. डिसले गुरुजींचे रविवारी मार्गदर्शन

डॉ. रणजीत डिसले

नेसरी : सी. एल. वृत्तसेवा    

    नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्या वतीने नुकताच निकाल जाहीर झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या नेसरी व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल दिप हॉल नेसरी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शन करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडचे जनक व ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. रणजीत डिसले गुरुजी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच गिरिजादेवी शिंदे असणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment