![]() |
पराग परशराम यरोळकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील रामपूर येथील कु. पराग परशराम यरोळकर यांची MPSC अराजपत्रित संयुक्त परीक्षा २०२३ मध्ये राज्य कर निरीक्षक (STI) पदी निवड झाली आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण दौलत विद्या मंदिर हलकर्णी येथून झाले व नवोदय विद्यालयातून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर पुणे इथून बी. ई. मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली आहे. MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्याने हे यश संपादन केले आहे. दोघेही शिक्षकी पेशात असणारे त्याचे वडील परशराम यरोळकर व आई पूजा यरोळकर यांनी त्याला दिलेल्या भक्कम पाठिंब्याला त्याने या यशाचे प्रथम श्रेय दिले आहे. तसेच यामध्ये त्याला आजपर्यंत शिक्षण देऊन घडवणार्या विविध शिक्षकांचा यामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. या यशामध्ये MY CLASS PUNE ACADEMY चे संचालक महेश घार्गे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले.
No comments:
Post a Comment