बेळगाव येथे मराठा विद्यार्थी व पालकांसाठी 'मानसिक शक्ती विकास' कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2024

बेळगाव येथे मराठा विद्यार्थी व पालकांसाठी 'मानसिक शक्ती विकास' कार्यक्रम


बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून बेळगाव व सीमा भागातील मराठा विद्यार्थी व पालकांसाठी मानसिक शक्ती विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाच्या बेळगाव शाखेच्या वतीने सैनिक भवन मंगल कार्यालय यळ्ळूर- वडगाव रोड यळ्ळूर, ता. बेळगाव येथे शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल.
        यावेळी सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर व समुपदेशक विनोद कुराडे हे स्मरणशक्ती, एकाग्रता व आत्मविश्वास वाढवण्याचे रहस्य. परीक्षेत भरघोस यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चिती कशी करावी? व्हिजनबोर्डचे रहस्य. आकर्षणाचा सिद्धांत (द लॉ ऑफ ऍक्टिव्हिटी). बहिर्मन, अंतर्मन व विश्व मनाचे आपल्या जीवनातील महत्त्व. क्रिएटिव्ह व्हीज्युअलायझेशन द्वारे हवे ते यश मिळवण्याचे रहस्य आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
        या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या आई-वडिलांचा भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी मराठा समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9663454841 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर व पदाधिकाऱ्यांनी केलै आहे.

No comments:

Post a Comment