चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2024

चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्वे (ता. चंदगड) येथे संस्था आवारामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी डॉ. सुनील रामचंद्र देशपांडे यांची निवड करण्यात आली. 

     उपस्थितांचे स्वागत डॉ. सुहास धबाले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. संजय मुरकुटे यांनी केले. सभा कामकाजामध्ये मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर नवीन कार्यकारणीची निवड करणे बाबत विचार करून डॉ.  मिलिंद पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील व उपाध्यक्ष डॉ. एन. टी. मुरकुटे व सचिव डॉ. चंद्रकांत शिंदे व खजिनदार डॉ. प्रशांत कदम कार्यकारणी सदस्य डॉ. दीपक पाटील चंदगड, डॉ. मारुती बिर्जे, डॉ. सागर गुंडप, डॉ. महेश पाटील, डॉ.  अप्पा बामणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला सर्व डॉक्टरांनी अनुमोदन दिले. 


     आयत्या वेळेच्या विषयांमध्ये सभासदावर झालेल्या अन्यायाचा विषय ऐरणीवर आला. त्यावर सविस्तर चर्चा होऊन त्या संदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाद मागण्याचे सर्वानुमते ठरले.  अध्यक्षीय मनोगतामध्ये सभासदावरील अन्यायाच्या विषयावर योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन
डॉ. सुनील देशपांडे यांनी दिले. 

       अध्यक्षांचे मनोगताबरोबरच डॉ. प्रशांत कदम, डॉ. एन. टी. मुरकुटे, डॉ. दयानंद पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. सुभाष पाटील, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सद्यस्थितीचा आढावा घेत खंत व्यक्त केली. सभा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी उपस्थित सर्व  तालुक्यातील डॉक्टर वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांचे आभार डॉक्टर संजय तळगुळकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment