खासदार छत्रपतीं शाहू महाराजांची माडखोलकर महाविदयालयास सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2024

खासदार छत्रपतीं शाहू महाराजांची माडखोलकर महाविदयालयास सदिच्छा भेट

 

कोल्हापूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     कोल्हापूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज व काँग्रेसचे जिल्हा नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील. यांनी चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालय सदिच्छा भेट दिली व सत्कार स्वीकारला.

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना चंदगड तालुक्यातून भरघोस मते मिळाल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी खासदार श्रीमंत छ. शाहू महाराज चंदगड दौऱ्यावर आले होते.

     यावेळी त्यांनी आवर्जून चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. एस.डी. गोरल यांनी छत्रपती शाहू महाराजांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा सत्कार न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. आर. पी. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांचा सत्कार केला.

    याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गडहिंग्लजचे काँग्रेसचे नेते विद्याधर गुरबे, माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment