शोषितांना माणूस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजानी दिली - प्राचार्य एन.डी. देवळे - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2024

शोषितांना माणूस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजानी दिली - प्राचार्य एन.डी. देवळे



चंदगड: सी. एल. वृतसेवा
         "लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी शोषित आणि वंचितांना शिक्षण आणि नोकऱ्या देऊन त्यांनी प्रगतीचे पंख दिले. या समाजघटकांना माणूस म्हणून जगण्याची संधी आणि अधिकार दिला. यासह अनेक वर्षांच्या बलाढ्य व्यवस्थेच्या विरोधात सत्यशोधकी विचारांचा जागर करीत ते कणखरपणे उभा राहिले. त्यांचे जीवनकार्य अद्भुत आणि प्रेरणादायी आहे.त्यांच्या विचारांची पताका कायम फडकत रहावी यासाठी आपण सर्वजण मिळून काम करत राहू. " असे प्रतिपादन प्राचार्य एन .डी. देवळे यांनी केले.
       दि न्यू इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शाहू महारांजाची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी. एस. चांदेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यासाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साठ विद्यार्थ्यांनी सहभा नोंदवला .
कार्यक्रमाला
       एम . व्ही . कानूरकर , व्ही .के. गावडे , टी. टी. बेरडे, व्ही . एम . मोहणगेकर,जे जी .पाटील , डी जी पाटील, व्ही. टी. पाटील,टी एस. खंदाळे,एस जे .शिंदे, पुष्पा सुतार, व्ही . क़े पाटील, व्ही. एम. डोंगरे, ओंकार पाटील, आर . एस . कांबळे ग्रंथपाल शरद हदगल , कुंदन पाटील उपस्थित होते .
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे यांनी तर आभार प्रा. एस. एन. निळकंठ यांनी मानले.

No comments:

Post a Comment