सुबराव गुंडू लोकापुरे |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवाशी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुबराव गुंडू लोकापुरे, वय ७४ यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. १७/०७/२०२४ रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. अंत्यविधी गुरवार १८ रोजी सकाळी ८.३० वाजता राजगोळी खुर्द येथे झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कालकुंद्री येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक लक्ष्मण साताप्पा जोशी यांचे ते दाजी होत.
त्यांनी तालुक्यातील विविध गावात शिक्षक म्हणून तर कोवाड व राजगोळी खुर्द येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली होती. रक्षा विसर्जन सोमवार दि. २२ रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment