चंदगड / प्रतिनिधी
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्प काल (गुरूवारी) रात्री ८ वाजता ओवरफ्लो झाला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी होनहाळ नाल्यात पडत आहे.तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील ९बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरणक्षेत्रात सुरू असल्यामुळे संततधार पावसामुळे धरणाचे पाणी सांडव्यावरून नदीपात्रात येणार आहे त्यामुळे होनहाळ नाला व ताम्रपर्णी नदीकाठच्या गावांतील नागरिकानी सतर्कता बाळगावी असे आवाहन चंदगड पाटबंधारे विभागाने केले आहे.
जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाची क्षमता १.२२ टीएमसी इतकी आहे. म्हणजेच (३४.८३७ द.ल.घ.मी)१२२३.७० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मागच्या आठवड्यात ८९ टक्के इतका पाणीसाठा होता मात्र आठच दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. जंगमहट्टी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय व सांडव्यावरून पाणी पडल्याशिवाय आज पर्यंत होनहाळ नाल्याला कधीही पूर आला नव्हता.हा प्रकल्प गत साली ४ऑगस्ट रोजी भरला होता. पावसाने तालुक्यात जोर घेतल्यामुळे या वर्षी हा प्रकल्प गतवर्षीपेक्षा हा प्रकल्प १५ दिवस लवकर ओव्हरफ्लोव झाला. हा प्रकल्प भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा उन्हाळ्यातील शेती,आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.मुसळधार पावसाने घटप्रभा नदीवरील हिंडगाव, कानडी, सावर्डे, अडकुर, तारेवाडी, कानडेवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील उमगाव, न्हावेली कुर्तनवाडी,आसगाव, चंदगड, कोकरे हल्लारवाडी हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
* जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाची आजची स्थिती *
* पाणी पातळी – ७२०.२० मी (+ ०.१०)
* एकूण पाणीसाठा –३४.५६ द.ल.घ.मी (१२२३.७० द.ल.घ.फू.) टक्केवारी - १००%
* मागील २४ तासातील पाऊस १०१ मि.मी.
* १ जून २०२४ पासून एकूण पाऊस-१३८३ मि.मी.
* सांडवा विसर्ग- ३३५.५२१ क्युसेक्स
* सिंचन विमोचक विसर्ग- 0 क्युसेक्स
फोटो ओळी :-- जंगमहट्टी ता.चंदगड येथील ओव्हरफ्लो झालेला प्रकल्प
No comments:
Post a Comment