शिवनगे येथील युवकाची अज्ञाताने केली ऑनलाईन फसवणूक, ३३ हजारांना लावला चुना - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2024

शिवनगे येथील युवकाची अज्ञाताने केली ऑनलाईन फसवणूक, ३३ हजारांना लावला चुना

 


चंदगड / प्रतिनिधी

         शिवणगे (ता. चंदगड) येथील दिनेश महादेव लोहार (वय २९ वर्ष) याला अज्ञात सायबर गुन्हेगाराकडून ३३ हजार शंभर रुपयांचा गंडा घालून सदर युवकाची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूक झालेल्या युवकाने चंदगड पोलिसांत सायबर गुन्हा दाखल केला आहें. यामध्ये फेक संदेश व फ़ोन, कॉलद्वारे युवकाची दिशाभूल करत, धमकावत पैसे लाट्ल्याचा प्रकार घडला आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी की, सदर युवकाला मंगळवार दि.१६ जुलै २४ रोजी सकाळच्या सुमारास फोनवर मेसेज आला, थोड्या वेळाने फ़ोन आला. व त्या नंतर व्हॉट्सअँप नंबरवर आपल्याला लॉटरी लागली असून तुमच्या खात्यात आम्ही २५ लाख पाठवत आहोत. तुम्ही सातत्याने व्हॉट्सअँप वापरत असलेने ही २५ लाखांची लॉटरी लागली असून तुमच्या बँक अकाऊंट वर आम्ही सदर रक्कम पाठवून देत आहोत. त्यानंतर काही वेळाने मात्र,इतकी रक्कम आपल्या अकाऊंट वर कोठून आली? म्हणून प्राप्तीकर विभाग आपल्यावर धाड टाकेल किंवा तुमच्यावर कारवाई करील.सदर कारवाई जर नको असेल तर ८ हजार रुपये पाठवा असे फ़ोनवरून सांगण्यात आले. दिनेशने ८ हजार शंभर रुपये तात्काळ पाठवले. पुन्हा २५ हजार रुपये पाठवा असे सांगितले. त्यावेळी दिनेशने परत ५ हजार पाठवले. पण एवढ्याने अज्ञात ईसम गप्पं राहिला नाही. पुन्हा त्याने दिनेशला धमकावत पैसे पाठव,अन्यथा कारवाईला सामोरे जा' अश्या प्रकारची धमकी वारंवार देऊ लागला.त्यामुळे दिनेशने धमकिच्या भीतीने गुगल पे वरून पुन्हा २० हजार रुपये पाठवले. त्यामुळे एकंदरीत ३३ हजार रुपये वसूल करूनही सायबर गुन्हेगार गप्पं राहिला नाही. पुन्हा त्याचे दिवसभर पैसे पाठवण्याचे धमकवण्यात फ़ोन येत होते.

त्यानंतर काही वेळाने सदर प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच दिनेशने चंदगड पोलिस ठाण्यात धाव घेतली व झालेंला सर्व प्रकार सांगितला.व त्यानुसार चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सदर प्रकरण सायबर संदर्भात असून चंदगड पोलिसांकडून सायबर पोलिस, कोल्हापुर यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यांत आली.

No comments:

Post a Comment