निरोगी जीवनासाठी वृक्षारोपन व वृक्षसंगोपन करा - वनरक्षक सचिन होलगे - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2024

निरोगी जीवनासाठी वृक्षारोपन व वृक्षसंगोपन करा - वनरक्षक सचिन होलगे



चंदगड / सी एल वृत्तसेवा
     सध्या आरोग्याच्या समस्या मोठया प्रमाणात निर्माण होत आहेत. प्रति महाबळेश्वर असणाऱ्या चंदगड तालूक्यातही यावर्षी प्रथमतःच तापमान 45 अंशावर गेले. आपले आरोग्य निरोगी राहण्या साठी प्रत्येकाने वृक्षारोपन करून त्या वृक्षांचे संगोपन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे विचार सचिन होलगे वनरक्षक भोगोली यानी व्यक्त केले.
 श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुझवडे येथे महाराष्ट्र शासन वन विभाग कोल्हापूर  वनपरिक्षेत्र चंदगड यांच्या वतीने  'एक पेड मॉ के नाम' हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. हरेर होते.
यावेळी कुरणी बुझवडेच्या वनरक्षक श्रीमती एस व्ही चाळके, कानूरच्या वनरक्षक श्रीमती सुषमा सरवदे यानी मनोगते व्यक्त केली. उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वड, पिंपळ, बेल, काजू, आंबा, फणस, जांभूळ आदि ५० हून अधिक वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी के बी पवार (वनसेवक कुरणी बुझवडे) रमेश कोकितकर, वाय बी पाटील, एस. के. पाटील, ए. ए. अंबी, रविंद्र गिलबिले आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत  एस के हरेर यानी केले सूत्रसंचालन टि. बी.  गावडे यांनी तर आभार एस. के. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment