चंदगड / प्रतिनिधी
मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर एसईबीसी दाखले सरकार मार्फत देण्यास सुरवात झाली अनेक नागरीकांनी दाखले काढले दाखले देताना एसईबीसी दाखला व नॉन क्रिमीलीअर दाखला एकत्रीत देण्यात आला पण काही दिवसांनी सरकारने नविन आद्यादेश काढला व एसईबीसी व नॉन क्रिमीलिअर दाखले वेगळे पाहीजेत असे जाहीर केले व पूर्वी एकत्रीत काढलेले दाखले रद्द केले.आता प्रवेश प्रक्रिया अंतिम टफ्यामध्ये आहे,नवीन दाखले काढेपर्यंत प्रवेशाची तारीख निघून जाणार आहे.शासनाच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे हे दाखले नविन काढणे पालकांना शक्य नाही त्यामुळे एसईबीसी व नॉन क्रीमीलीअर दाखले वेगळे पाहीजेत असा आदेश होण्यापूर्वीचे सरकारने दिलेले एकत्रीत दाखले ग्राह्य धरावे व मराठा मुलाचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे मराठा समाजातून मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment